परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील मौजे सेलू येथे गुरूवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी भावार्थ रामायणातील लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बालकिर्तनकार हभप जनाई महाराज कोकाटे यांच्या ओजस्वी व सुमधूर आवाजातून रात्री 9 वाजता कीर्तन होणार आहे.
मौजे सेलू येथे गुरूवार दि.15 फेब्रुवारी रोजी समस्त गावकरी मंडळाच्या वतीने लक्ष्मण शक्ती कार्यक्रम सकाळी 6 वा. होणार असून कार्यक्रमाची सांगता दुपारी 4 वाजता होणार आहे. तद्नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रात्री 9 ते 11 वाजेदरम्यान बालकिर्तनकार ह.भ.प.जनाई महाराज कोकाटे यांच्या ओजस्वी व सुमधूर आवाजातून कीर्तन होणार आहे.
या धार्मीक कार्यक्रमाचा समस्त गावकर्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन मौजे सेलू ता.परळी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment