बीड (प्रतिनिधी) : टोल नाक्यावरील बेकायदेशीर वसुली केल्यावरून वाहनधारक आणि टोलनाक्यावरील कर्मचारी यांच्यात चांगलाच वाद झाल्याचा प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. अहमदनगर- अहमदपूर या राष्ट्रोय महामार्गावरील पाटोदा तालुक्यात वैद्यकिन्ही टोल नाक्यावर हा प्रकार घडला आहे.
प्रत्येक टोलनाक्यावर वाहनांप्रमाणे तोल निश्चित करण्यात आला आहे. शिवाय फास्टटॅग सिस्टीम लावण्यात आली आहे. त्यानुसार फास्टटॅग मधून पैसे कटल्यानंतरही कर्मचारी मुजोरीची भाषा करत गाडी सोडत नव्हते म्हणून वाद पेटला. तसेच यावेळी या टोलनाक्यावर अवजड वाहन धारकाकडून बोगस पावत्या देऊन वसुली केला जात असल्याचा आरोप देखील वाहन धारकांनी केला आहे. या लुटीच्या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांना लेखी तक्रार करणार असल्याचे देखील सांगितलं..
शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाकडूनच मागितले जास्तीचे पैसे.
विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख राहुल चौरे यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. यावेळी त्यांनी टोल नाक्यावरील मॅनेजरसह कर्मचाऱ्यांना जाब विचारला. मात्र यावेळी अरे तुरीची भाषा करत टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिली. जर ही लूट थांबली नाही तर टोल नका फोडू; असा इशाराही राहुल चौरे यांनी दिला.
No comments:
Post a Comment