बीड (प्रतिनिधी) वाटणी पत्राआधारे जमिनीची मालकी हक्कात नोंद घेण्यासाठी सज्जा पिंपळगाव घाट येथील तलाठ्याने 17 हजाराच्या लाचेची मागणी केली तडजोडअंती 15 हजाराची लाच स्वीकारताना खाजगी इसमास बीड एसीबीने बुधवारी दुपारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई चौसाळा परिसरात करण्यात आली असून या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराची मौजे पिंपळगाव घाट येथे वडिलांच्या नावे शेत गट क्र. 664, 676, 669, 681, 683, 684, 685, 687 मधील शेतजमीन आहे .या जमिनीची वाटणी पत्राआधारे तक्रारदार यांचे व
त्यांचे भाऊ यांचे नावे खाते फोड आधारे 100 रुपयांचे बॉण्डवर वाटणीपत्र केले होते, वाटणीपत्रा आधारे तक्रारदार व त्यांचा भाऊ यांची 7/12 ला मालकी हक्कात नोंद घेण्यासाठी पिंपळगावचे तलाठी दिलीप कनेरकर यांची भेट घेतली असता त्यांनी सदर काम करुण देण्यासाठी 17 हजार रुपयाची लाच मागितली. तक्रारदार यांना तलाठी कनेरकर मागणी करत असलेली लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी बीड एसीबी येथे तक्रार दिली. बुधवारी दि.28 रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता लोकसेवक तलाठी कनेरकर यांनी तक्रारदार यांना त्यांचे प्रलंबित काम करण्यासाठी 17 हजार लाचेची मागणी करून तडजोड अंती 15 हजार स्वीकारण्याचे मान्य करून लाच खासगी मदतनीस दिगंबर गात यांचे मार्फत स्विकारण्याचे मान्य केले. त्यावरुन तलाठी कनेरकर यांचे चौसाळा येथील सुलतानपुर रोडवरील खाजगी कार्यालयात सापळा कारवाईचे आयोजन केले असता खाजगी ईसम दिगंबर गात यांनी तलाठी कनेरकर च्या सांगण्यावरुन पंचासमक्ष 15 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी नेकनुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे, सुरेश सांगळे, हनुमान गोरे, श्रीराम गिराम, भरत गारदे, संतोष राठोड, गणेश मेहेत्रे, स्नेहलकुमार कोरडे यांनी केली.
No comments:
Post a Comment