Friday, February 16, 2024

मराठा आरक्षण.आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत यासाठी चौसाळा बायपास वर आंदोलन.धुळे सोलापूर महामार्ग बंद.


चौसाळा (प्रतिनिधी) मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भातील ‘सगे सोयरे’ या मागणीचे कायद्यात रूपांतर व आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत यासाठी दहा तारखेपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे त्यांची तब्येत जास्त खराब होत असल्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा बांधव अंतरवलीसराठी येथे दाखल होत आहेत व त्यांना उपचार घेण्याचा आग्रह करत आहेत. त्यासाठी अनेक ठिकाणी वेगवेगळे मार्गाने आंदोलन केले जात आहे त्यानुसार चौसाळा बायपास येथे गुरुवार दि.15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग 52 वर टायर जाळून दीड ते दोन तास रस्ता रोको करण्यात आला यावेळी राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या दोन-तीन तर्फी रांगा लागल्या होत्या तर या ठिकाणचा रास्ता रोको समाप्त होतात रौळसगाव येथील चौकात सुद्धा रस्ता रोको करण्यात आला. यामुळे मराठा आरक्षण विषयी मराठा समाजात किती तीव्र भावना आहेत हे सरकारने गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर जरांगे पाटील यांचे उपोषण सोडून मराठा आरक्षण संदर्भात कायदा करावा ही या मागची भावना असल्याचे सकल मराठा बांधवांच्या वतीने बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment