Saturday, June 10, 2023

मद्यधुंद चालकाने एकाचा जीव घेतला. भरधाव ट्रकने चिरडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू.


*दारूच्या नशेत चालकाने ट्रक चालवल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

आष्टी (प्रतिनिधी)  : भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडल्याची धक्कादायक घटना शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आज सकाळी १० वाजेच्या दरम्यान घडली. रामकिसन काकडे ( ६६) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, दारूच्या नशेत चालकाने ट्रक चालवल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

आष्टी शहरातील बीड नगर राष्ट्रीय महामार्गावरील डाॅ.आंबेडकर चौकात आज सकाळी दहाच्या सुमारास ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाला. प्रत्यक्षदर्शिंच्या सांगण्यानुसार ट्रकचा चालक दारूच्या नशेत होता. पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे. 

सिमेंट वाहतुक करणारा ट्रक ( एमएच 16  सीडी 2466) हा जामखेड कडे चालला होता. भरधाव ट्रक आष्टी शहरातील आंबेडकर चौकात आल्यानंतर समोरून येणाऱ्या दुचाकीस (एमएच 23 एएम 9719) जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार रामकिसन काकडे ( रा शिदेवाडी, 66 ) यांना ट्रकने चिरडले. डोक्यावरून ट्रकचे पाठीमागचे चाक गेल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

No comments:

Post a Comment