नेमकं प्रकरण काय?
आपल्या भावाच्या मदतीने पत्नीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना बीडच्या केज तालुक्यातील आडस गावात घडली आहे. पती दारु पिऊन दररोज त्रास देत असल्याने पती आणि पत्नीमध्ये रोज वाद होत होते.
त्यामुळे पत्नीने भावाच्या मदतीने नवऱ्याचा काटा काढला. विकास अस खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयत हा एका शेतात सालगडी म्हणून काम करत होता. तर याप्रकरणी मयताच्या आईच्या तक्रारीवरून, बीडच्या धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पत्नी आणि तिचा भाऊ या दोघांविरोधात कलम 302, 504, 34 भा.द.वी. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गळा आवळल्याने विकासचा मृत्यू झाल्याचा अहवाल असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
No comments:
Post a Comment