केज (प्रतिनिधी) :- नातेवाईकांच्या मुलीसाठी मुलगा पहायला केजकडे मोटार सायकलावरून जात असलेले एक सहशिक्षक आणि त्यांच्या पत्नीला केज-मांजरसुंबा रोडवर सारणी (सांगवी) पाटीवर एका इको सँडची वाहतूक करणाऱ्या टिप्परची व त्यांच्या मोटारसायकलची धडक झाली. यात मोटार सायकल चालवीत असलेल्या सहशिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच केज पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविला असून जखमी महिलेला उपचारासाठी अंबाजोगाई येथे पाठविले आहे.
No comments:
Post a Comment