ही धक्कादायक घटना बीडच्या आष्टी तालुक्यात असणाऱ्या ठोंबळसांगवी गावात घडली आहे. याप्रकरणी बीडच्या अंभोरा पोलीस ठाण्यात पतीसह सासू विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा येथील तरुणी आणि सांगवी येथील एका तरुणाचे एकमेकांवर प्रेम जडले होते. याच प्रेमाचे रूपांतर 3 महिन्यांपूर्वी लग्नात झाले होते. एकमेकांवर जीवापाड प्रेम असलेल्या दोघांनीही सुखी संसाराचे स्वप्न पाहिले होते. मात्र, काही दिवसातच घरात कलह निर्माण झाला.
यामुळं कंटाळून तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. पती नगरला, तर सासू शेळ्या चारण्यासाठी शेतात गेली असता नवविवाहित तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तर तरुणीच्या मामाने सदरील आत्महत्या ही पती आणि सासूच्या जाचास कंटाळून केल्याचा आरोप केला आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंभोरा पोलीस ठाण्यात पती आणि सासू यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यातील आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment