बीड शहरातील महात्मा फुले, सावित्रीमाई फुले यांच्या पुतळा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आंदोलन केले आहे. या सरकारच्या काळात जाणीवपूर्वक महापुरुषांना बदनाम केले जात आहे. महापुरुषांचे पुतळे बाजूला केले जात आहेत. अगोदर छत्रपती शिवरायांची बदनामी, त्यानंतर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यासह अनेक महापुरुषांच्या बदनामी या सरकारच्या काळात होत आहे. यामुळे अशा सरकारला समाज त्यांची जागा दाखवेल.
नुसता गुन्हा दाखल नको
मात्र आज आमची एकच मागणी आहे. आज त्या दोन्ही वेबसाईटवर गुन्हा दाखल झाला. मात्र गुन्हा दाखल करून चालणार नाही. या वेबसाईटवरच्या समाजकंटक असणाऱ्या लेखकांनी हे लेखन केले. त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment