Monday, June 19, 2023

मुक्ताईंच्या पालखीला अपघात.चार महिला वारकरी जखमी रुग्णालयात दाखल प्रकृती स्थिर..

बीड (प्रतिनिधी) बीड मधून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या मुक्ताईंच्या पालखीला अपघात झाला. या अपघातात चार महिला वारकरी जखमी झाल्या. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

रात्री उशिरा मोरगाव फाट्यावर मुक्ताईंच्या पालखीने विसावा घेतला होता. याच दरम्यान रस्त्यावरून जात असलेल्या मोटार सायकलने पालखीला धडक दिली. यामध्ये चार महिला जखमी झाल्या आहेत. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी आपली टीम तैनात ठेवली. हे रुग्ण दाखल होताच त्यांना प्रथमोपचार करण्यात आले. सध्या रुग्णांची प्रकृती स्थिर असून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

No comments:

Post a Comment