केज (प्रतिनिधी) तालुक्यातील श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थान येथे आषाढी एकादशी निमित्त तुकोबा, विठोबा च्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थान येथे आषाढी एकादशीनिमित्त पंचक्रोशीतील अनेक गावच्या दिंड्या रामकृष्णहरि, विठोबा-तुकोबाच्या नावाचा गजर करत पावनधाम येथे दाखल झाल्या. दिंडीत पुरूष, स्त्रियां, लहान-थोर मंडळी मोठ्या उत्साहाने दाखल झाले होते. सर्व दिंड्याच्या आगमनानंतर ह.भ.प.जनार्धन महाराज चलवाड यांची किर्तन सेवा तुकोबा-विठोबाच्या गाभार्यात संपन्न झाली.
किर्तन ऐकताना उपस्थितांना जनू आपण पंढरीतच आहोत असा भास होत होता.किर्तन सेवेनंतर फराळाची सोय करण्यात आली होती.
संत तुकोबाराय पावनधाम संस्थानचे संस्थापक अध्यक्ष महंत ह.भ.प.महादेव महाराज बोराडे शास्त्री हे शेकडो वारकर्यांसह पंढरीच्या वारीत आहेत. ज्या भाविकांकाना पंढरीच्या वारीला जाता आले नाही त्यांच्यासाठी संत तुकोबाराय पावनधाम संस्थान हे प्रति पंढरीच आहे. महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या मार्गदर्शनानुसार ह.भ.प.जनार्धन महाराज चलवाड आणि स्वयंसेवकांनी येणार्या भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली.
No comments:
Post a Comment