Thursday, June 8, 2023

धक्कादायक..! एकाच मुलीचा तीन वेळा बालविवाह; चाईल्ड लाईन ने आणली माहिती समोर.

बीड (प्रतिनिधी) : बालविवाहाचा अतिशय धक्कादायक प्रकार बीडमध्ये पुन्हा एकदा समोर आला. एकाच मुलीचा तीन वेळा बालविवाह लावल्याची धक्कादायक माहिती चाईल्ड लाईनने समोर आणली आहे. यात १४ व्या वर्षी पहिला आणि १७ व्या वर्षी तिसऱ्यांदा या मुलीचा बालविवाह लावण्यात आला असून ही धक्कादायक घटना बीडच्या शिरूर तालुक्यामध्ये समोर आली. 
बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी येथील ऊसतोड कामगाराच्या १४ वर्षीय मुलीचा २२ डिसेंबर २०२० ला पहिल्यांदा विवाह उखंडा येथील तरूणाशी झाला होता. परंतु मुलगी सासरी नांदलीच नाही अन्‌ अवघ्या १० महिन्यातच मुलगी माहेरी परतली. नंतर या मुलीचा दुसरा बालविवाह १८ फेब्रुवारी २०२२ रोजी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रूई गावातील तरुणाशी लावून देण्यात आला होता. या ठिकाणीही ती मुलगी नांदली नाही

तिसऱ्या विवाहात प्रकार आला समोर

तर आता तिसरा विवाह मुलीच्या घरी ७ जून २०२३ ला दहीवंडी येथील ३४ वर्षांच्या तरूणाशी झाला. सध्या मुलीचे वय १७ वर्षाचे आहे. ही माहिती चाईल्डच्या हेल्पलाईनवर मिळताच त्यांनी तिथे धाव घेतली. अधिक चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक माहीती समोर येत हे तिन्ही प्रकरणे समोर आली आहेत. दरम्यान याप्रकरणी बीडच्या शिरूर कासार पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

No comments:

Post a Comment