Friday, February 10, 2023

दोस्त दोस्त ना रहा.पार्टीत मित्राने मित्रावर झाडली गोळी. पोलीसात गुन्हा दाखल. दोन्ही युवक गुन्हेगारी प्रवृत्तीचे .

नांदेड (कांतीकारी साथी न्युज) जिल्ह्यात ओल्या पार्टीतील झालेल्या वादातून मित्रानेच मित्रावर बंदुकीतून गोळी झाडली. यात मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना. शहरातील नुर चौकात गुरुवारी रात्री घडली आहे.
या घटनेत शेख युनूस शेख गुड्डू असं गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. तर संतोष कर्णेवार असं गोळी झाडणाऱ्या संशयिताचे नाव असल्याचे पाेलिसांनी सांगितले. शेख युनूस याच्या पोटात गोळी लागल्याने त्याला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणात विमानतळ पोलिसांनी संतोष कर्णेवार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. शेख युनूस आणि संतोष कर्णेवार हे दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याची माहिती पोलिसांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. दोघांत नेमक्या कोणत्या कारणाने वाद झाला याचा तपास पोलीस करीत आहे.

No comments:

Post a Comment