Sunday, February 5, 2023

अंघोळ करताना महिलेचे फोटो कॅमेऱ्यात कैद.व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार,

*मागील अनेक महिन्यांपासून हा तरुण महिलेवर अत्याचार करत असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

हिंगोली (प्रतिनिधी) महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नाहीयेत. हिंगोलीमधून देखील एक घृणास्पद घटना समोर आली आहे. हिंगोलीच्या आमला गावात ३० वर्षीय युवकाने महिलेचा आंघोळ करतानाचा फोटो मोबाईलमध्ये कैद करत अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
महिलेने या बाबत पोलिसात धाव घेत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, मागील अनेक महिन्यांपासून हा तरुण महिलेवर अत्याचार करत असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान अंघोळ करताना आरोपीने महिलेचा फोटो कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे आपण या तरुणाच्या अत्याचाराला बळी पडल्याचे देखील या महिलेने पोलिसांना सांगितले आहे. 
या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिसात आरोपी परमेश्वर कोरडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment