Tuesday, March 15, 2022

खळबळजनक ! बीड बसस्थानकात अज्ञात व्यक्तीची आत्महत्या.

बीड (प्रतिनिधी) :- बीड येथील मध्यवर्ती बस स्थानकात एका बाजुला उभी असलेल्या बस मध्ये एक्या अज्ञात व्यक्तीने बस मध्ये गळपास घेतलेलं आढळून आला आहे दुपारी दीड ते दोनच्या सुमारास ही घटना उघडकीस झाल्यानंतर बस स्थानकात मोठी 

खळबळ उडाली होती. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाला असून पुढील तपास पोलीस प्रशासन घेत आहे.

बीड येथील बस स्थानकात एका बाजूला उभी असलेली बस यामध्ये 50 ते 60 व वृद्ध असलेल्या व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत काही लोकांना दिसल्यानंतर एकच खळबळ उडाली मात्र हा व्यक्ती कोण आहे ? कुठून आला आहे? काही कळालेले नसून घटनास्थळी पोलिस प्रशासन दाखल होऊन मृतदेह खाली उतरविण्यात आला आहे पुढील तपासासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे मात्र हा व्यक्ती कोण आहे हे अद्याप समजू शकले नाही मात्र पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे.

No comments:

Post a Comment