Tuesday, March 15, 2022

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा समाजाच्या कल्याणासाठी : - ह.भ.प.पूंडलीक महाराज देहूकर


श्रीक्षेत्र औरंगपूर येथील पावनधाम हे प्रती देहूच आहे. संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील विचार तळागळात पोहंचवण्याचे काम महंत बोराडे महाराज करत आहेत.शेतकरी आणि तरूणांना दिशा देण्याचे महान कार्य पावनधाम संस्थानच्या माध्यमातून महंत महादेव महाराज बोराडे करत असल्याचे गौरव उदगार ह.भ.प.पूंडलिक महाराज देहूकर यांनी काढले.
    केज तालुक्यातील श्रीक्षेत्र औरंगपूर येथे संत तुकोबाराय पावनधामवर संत तुकाराम महाराजांच्या बीजे निमित्त आयोजित सप्ताह सोहळ्याच्या पहिल्या  मालेतील पुष्प गुंफन्याचा मान तुकाराम महाराजांचे वंशज पूंडलिक महाराज देहूकर यांना मिळाला.
पावनधाम या ठिकाणी महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री  यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या संत तुकाराम महाराज बीज सप्ताह सोहळ्यात किर्तन,प्रवचन आणि पोवाड्याच्या माध्यमातून तुकोबांच्या गाथेतील विचार सामान्यां पर्यंत पोहचवण्याचे काम होत आहे.बीजेच्या सप्ताह काळात समाजातील अनेक दानशूरांच्या मदतीने चोवीस तास अन्नदान होत आहे.तसेच राज्यभरातून किर्तनकार आपली किर्तन सेवा संत तुकाराम महाराजांच्या चरणी समर्पित करत आहेत.त्याच अनुशंगाने संत तुकाराम महाराजांचे अकरावे  वंशज ह.भ.प.पूंडलिक महाराज देहूकर यांच्या कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते.ज्ञानोबा-तुकोबा आणि विठोबाच्या नामस्मरणांने मंत्रमुग्ध झालेल्या पावन भूमीत कीर्तन सेवा सादर करताना पुंडलिक महाराज देहूकर म्हणाले की,संत तुकाराम महाराजांचे विचार ज्यांनी समजून घेतले त्यांना खर्या अर्थाने जीवन कळाले.पुढे बोलताना ते म्हणाले,ज्यांना कोणत्याच धामाला जाता येत नसेल त्यांनी पावनधामला येऊन पावन व्हावे.पूंडलिक महाराजांनी आपल्या रसाळ वाणीने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी महंत महादेव महाराज बोराडे,अमोल महाराज,अशोक महाराज,जनार्धन महाराज चलवाड, हनुमंत म.सिरसाट,सुर्यकांत नांदूरे,दिलीप शिंदे,भागवत शिंदे,सुदाम पाटील,पंडित सावंत,सौदागर कदम,फुलचंद काकडे,शंकर उबाळे,अरूण काळे,गणेश महाराज भगत,प्रशांत निगडे,सचिन पतंगे,उमेश करपे,केशव धनगरे,पत्रकार संतोष रोकडे,उत्तम पारेकर,गणपत पांचाळ,तुकाराम कापसे यांच्या सह आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment