Monday, March 14, 2022

विद्युत वितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा शॉक लागुन मृत्यु.






परळी वैजनाथ (प्रतिनिधी) तालुक्यातील वडखेले येथील शेतकरी पांडुरंग तुकाराम पोटे (वय ४५) यांचे रवीवारी (ता.१३) सकाळी अकरा वाजता शॉक लागुन मृत्यु झाला आहे. विज वितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा मृत्यु झाला.
     शेतात कोळपणी करण्यासाठी पांडुरंग तुकाराम पोटे रवीवारी (ता.१३) सकाळी अकराच्या दरम्यान कोळपनीचे औजार गोळा करीत होते. कोळप लोखंडी होते. एक कोळप हातात तर दुसर कोळप खांदयावर घेउन स्वतःच्या शेतात ठेवताना हा अपघात घडला. हातातील कोळप खाली ठेवताना खांदयावरील कोळपची दांडी ताराला लागली . त्यात शॉक लागुन पांडुरंग पोटे यांचा जागीच मृत्यु झाला. जमीनी पासुन केवळ आठ फुट अंतरावर तारा असल्यानेच शेतकऱ्याचा मृत्यु झाला. शेतकऱ्याचा मृत्यु शॉक लागुन झाल्यानंतर दिवसभर प्रशासनाच्या कोणीही भेट दिली नाही. पोलीसांनी पंचनामा केलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

No comments:

Post a Comment