Friday, March 11, 2022

मराठमोळी वेशभूषा स्पर्धेत हर्मिका जगतकर प्रथम.तर कर्तृत्ववान महिलांचा सन्मान संपन्न.



बीड (प्रतिनिधी)  मनसे आयोजित 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मराठमोळी वेशभूषा व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला बीड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे महिलांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला मराठमोळी वेशभूषा या स्पर्धेत मोठ्या गटातून प्रथम पारितोषिक कु. हर्मिका बालाजी जगतकर केली पटकावले तर द्वितीय पारितोषिक मंजू खांडेकर, तृतीय पारितोषिक सुरेखा कोठुळे, लहान गट अंशिका शेवाळे प्रथम, निर्मिती कातकडे ,द्वितीय या सर्वांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह व रोख स्वरूपात पारितोषिक वितरण करण्यात आले या सर्वांना प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व रोख स्वरूपात पारितोषिक वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाच्या संयोजक मनसेचे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी वर्षा जगदाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून केएसके  कॉलेजच्या प्राचार्य  दीपा क्षीरसागर पीएसआय सुरेख धसे, समाजसेविका मनीषा तोकले, प्रा.अनिता भोसले, परीक्षक स्वाती  सिद्धार्थ अग्रवाल,या कार्यक्रमाला बीड शहरातील जवळ पास शंभरच्या वर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला महिलांची उपस्थिती होत्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सिद्धार्थ अग्रवाल यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment