केज (प्रतिनिधी) :- केज तालुक्यातील एका गावात एका विवाहित महिलेचा तिच्या भावकितील नराधमानेच विनयभंग केल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. ८ मार्च मंगळवार रोजी सकाळी ९:३० वा. केज तालुक्यातील शिंदी येथे एका नाराधमाने त्याच्याच भावकितील एका विवाहित महिला ही एकटीच घरात असल्याचा गैरफायदा घेत तिच्या अंगाशी झोंबाझोंबी करून तिचा विनयभंग केला आणि तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. हा प्रकार कुणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान दि. १३ मार्च रोजी पिडीत महिलेच्या फिर्यादी वरून त्या नराधमाच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात महिला पोलीस ठाणे अंमलदार रुक्मिणी पाचपिंडे यांनी गु.र.नं. ७१/२०२२ भा.दं.वि. ४५२, ३५४, ३५४(अ), ३५४(ब), ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment