बीड (प्रतिनिधी) रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानेरिपब्लिकन सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष रवी वाघमारे यांची रिपब्लिकन युवा सेनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड झाली आहे.

रिपब्लिकन सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष रवी वाघमारे यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय सरचिटणीस संजीव बोधनकर यांनी त्यांच्यावर युवा सेनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड केली.प्रदेशाध्यक्ष किरण भाऊ घोंगडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले

रवी वाघमारे यांच्यावर बीड जिल्ह्यासह औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद,लातूर या चार जिल्ह्यातील रिपब्लिकन युवा सेनेच्या पक्ष वाढीसाठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. 

याप्रसंगी युवा सेनेचे मराठवाडा अध्यक्ष रवी वाघमारे म्हणाले की, पक्षाचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी माझी निवड करून माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे त्या जिम्मेदारीस पूर्णपणे एकनिष्ठ राहून पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचे सांगत पक्षाच्या माध्यमातून सर्व सामान्य, वंचित, गोर गरीब लोकांसाठी काम करणार असल्याचे सांगितले

याप्रसंगी मराठवाडा कार्याध्यक्ष मुजीप खान पठाण, मराठवाडा निरीक्षक अनिल शिरसे, सय्यद नय्युम, धम्मदिप वडमारे, अमित भैया जोगदंड,अजय गोरे यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते