Monday, March 7, 2022

जागतिक महिला दिनाचे औचित्या साधुन केज पोलीसांच्या वतिने मुलींना मिळणार कराटे प्रशिक्षण.


प्रतिकात्मक फोटो

*पंकज कुमावत आणि सपोनि वाघमोडे यांचा अनोखा उपक्रम !

केज (प्रतिनिधी) : आंतर राष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून केज पोलिसांच्या वतीने मुलींना कोणत्याही संकटांना सामोरे जाण्याची हिम्मत निर्माण व्हावी म्हणून मोफत कराटे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

दि ८ मार्च हा जागतिक महिला दिन आहे. या निमित्त केज पोलीसांनी एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. तो म्हणजे स्त्री ही अबला नसून सबला आहे. तिच्या अंगी हिम्मत यावी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक बीड यांचे संकल्पनेने आणि अपर पोलिस अधीक्षक अंबाजोगाई व सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनाखाली केज पोलीस स्टेशनच्या प्रांगणावर ८ मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त मुलींसाठी पंधरा दिवसाचे मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे आहे. हे प्रशिक्षण शिबीर महिला पोलीस अधिकारी यांच्या देखरेखीखाली घेण्यात येणार आहे. तेव्हा पालकांनी आपल्या पाल्य मुलींना वेळेवर हजर करून या मोफत कराटे प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी केले आहे. 

तसेच दि. ८ मार्च रोजी पोलीस अधिकारी यांचे मार्फत मुलींसाठी कायद्याने त्यांचेसाठी दिलेले संरक्षण. या बाबत पण मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्या करिता सर्वांनी वेळेवर हजर राहण्याचे आवाहन सपोनि शंकर वाघमोडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment