Saturday, March 19, 2022

प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या केंद्राच्या वर्धापनदिना निमित्त मिडिया संमेलनाचे आयोजन .


मालेगाव (प्रतिनिधी) - मालेगाव शहरातील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालया मध्ये उद्या ता 20 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता मीडिया संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या केंद्राच्या वर्धापनदिना निमित्त हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय व ब्रह्मकुमारी ज च्या वतीने देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून मालेगाव तालुक्यातील पत्रकार बांधवाकरिता मीडिया संमेलन आयोजित करण्यात आले आहे
सकारात्मक पत्रकारिता हा या संमेलनाचा विषय आहे
शिबिरात मार्गदर्शन करण्या साठी संपादक राजेश राजोरे ,दिलिप गिर्हे ,प्रा अतुल विखे ,रवी अंभोरे उपस्थित राहणार आहेत या संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मालेगाव केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे

पत्रकार म्हणून कार्य करीत असताना पत्रकारांना ताण तणावाला सामोरे जावे लागते .ध्यानाने त्यामधून मुक्तता मिळु शकते सकारात्मक पत्रकारिता कशी करावी याबाबत संमेलनात मार्गदर्शन करण्यात येणार आहे त्यामुळे तालुक्यातील पत्रकार बांधवांनी संमेलनास उपस्थित राहावे असे आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या संचालिका ब्रह्मकुमारी स्नेहलता दीदी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment