त्यानंतर शरद पवार यांनी नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा समाचार विरोधी पक्षातील सर्वच नेत्यांनी घेतला व शरद पवार यांच्यावर टीका सुरु केली. त्यात आता भाजप नेते निलेश राणे यांनी गंभीर आरोप केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेच दाऊदचा माणूस आहेत, असा संशय येतोय असे निलेश राणे म्हणाले.
काय म्हणाले निलेश राणे
निलेश राणे यांनी केलेल्या आरोपाचे वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले असून त्यानुसार “मला संशय येतोय की पवार साहेबच महाराष्ट्रात दाऊदचा माणूस आहेत. अनिल देशमुख यांनी काय केले होते ? त्यांचा राजीनामा कसा झटपट घेतला होता. तेव्हा विचार केला होता का ? नवाब मलिक कोण आहेत. नवाब मलिक शरद पवार यांचे कोण लागतात ? ज्यांनी व्यवहार केला. ज्यांनी दाऊदच्या बहिणीला पैसे दिले. दाऊदच्या माणसाला पैसे दिले. बॉम्बस्फोटातील आरोपीला पैसे दिले, त्यांचा राजीनामा घेतला जात नाही,” असेही निलेश राणे म्हणाले.
मलिकांच्या याचिकेवर १५ मार्चला सुनावणी
नवाब मलिक यांच्यावर कुख्यात गुंड दाऊद ईब्राहिम याच्याशी संबंधित असलेल्या मालमत्तांच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या आरोपांखाली ईडीने मलिक यांची आठ तास चौकशी करुन त्यांना अटक केली.
ही अटक कायद्यानुसार नाही असा दावाही मलिकांचा आहे. याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झालेली असून न्यायालय येत्या १५ मार्च रोजी आपला निकाल देणार आहे.
No comments:
Post a Comment