परळी ( प्रतिनिधी) :- आज १७ मार्च २०२२ रोजी हज़रत मौलाना मुहम्मद उमरैन महफुज रहमानी परळीत एका धार्मिक "इसलाह-ए-मुआशरा" च्या कार्यक्रमात आज दि. १७ मार्च गुरुवारी संध्याकाळी ०७ वाजता डॉ जाकेर हुसैन चौक ( बरकत नगर चौक) येथे कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात मदरसा अल-जामिया राशिदा लिबिनातुल मुस्लिमीन च्या चार विद्यार्थ्यांनी 'आलेम' हि धार्मिक पदवी पुर्ण केलेल्या सनद (पदवी ) वितरण सोहळा इस्लामिक नामवंत धर्मगुरू हज़रत मौलाना हज़रत मौलाना मुहम्मद उमरैन महफुज रहमानी ( सेक्रेटरी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड चे मेंबर मौलाना जुनेद आझाद , मुफ्ती अश्फाक खासमी साहेब व मुफ्ती शफिक मिल्ली रहमानी ( बीड जिल्हा अध्यक्ष जमियात उलमा-ए- हिंद) आणि जनाब मोहम्मद इरफान साहब (डायरेक्टर इक्रा एज्युकेशन बेंगलुरु) या सर्वांचे परळीत आगमन निमित्ताने धार्मिक अभ्यासक अशा विचारांचा लाभ घ्यावा असे आवाहन मौलाना शेख तैयमुर मिल्ली सहाब यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment