*केज शहर स्वच्छ करणार -हारुण इनामदार.
केज (प्रतिनिधी) केज नगरपंचायत स्वच्छता सर्वेक्षण 2022 अंतर्गत संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचा पंधरवडा लोकसहभागातून दिनांक 14 – 03- 2022 रोजी 28 -03- 2022 पर्यंत स्वच्छता राबवण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे उद्घघाटक म्हणून बीड जिल्हा अधिकारी राधाबिनोद शर्मा हे होते.
या वेळी बोलताना त्यांनी सांगितले की स्वच्छ शहर ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरा पासुन स्वच्छतेची सुरवात करावी,आपले घर आपला परिसर व आपले शहर स्वच्छ ठेवावे.
या कार्यक्रमला अध्यक्ष म्हणून सुरेश तात्या पाटील,जनविकास परिवर्तन आघाडी चे सर्वेसर्वा मा हारुण भाई इनामदार साहेब नगराध्यक्षा सिताताई बनसोड,पशुतिनाथ दांगट,केजचे तहसीलदार दुधाजी मेडके,आरोग्य अधिकारी आठवले , नायब तहसीलदार सचिन देशपांडे,किसन कदम नगरसेवक, न.प.कर्मचारी,पत्रकार,रोटरी क्लब,युवा मंडळ ,बचत गटाचे अध्यक्ष ,शहरातील व्यापारी नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते,
जिल्हाधिकारी साहेब यांच्या हास्ते डसबिनचे उद्घघाटन करण्यात आहे केज शहरातील प्रत्येक घरात करचा ठेवण्यासाठी डसबिनचे वाटप करण्यात येणार आहेत,
आज अभियानाच्या पहिल्या दिवशी नगरपंचायत ते मंगळवार पेठ रोडवर स्वतः हातात झाडू घेऊन नगर अध्यक्षा सिताताई बनसोड व जनविकास परिवर्तन आघाडीचे नेते हरूनभाई इनामदार यांच्या सह न.प. सभापतीनगरसेवक ,न.प.
कर्मचारी यांनी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाची सुरवात केली आहे ,
…………………………………………………
या कार्यक्रमास जनविकास परिवर्तन आघाडीचे नेते हरूनभाई इनामदार यांनी येणाऱ्या काळात केज शहरातील विकास कामासह व विविध योजनाची माहिती बीड जिल्हा अधिकारी श्री. राधाबिनोद शर्मा सह केज शहरातील नागरिकांना दिली आहे.
No comments:
Post a Comment