डीसीसी बॕकेत कर्मचाऱ्यांच्या खुर्चीवर बाहेरच्या मंडळींचीच बैठक.बॕकेच्या करभारात ही ढवळाढवळ शेतकऱ्याची होत आहे आर्थिक पिळवणूक याला आळा बसणार का?
बीड (प्रतिनिधी)शेतकऱ्यांची आर्थिक नाडी असलेल्या डीसीसीच्या चौसाळा शाखेत बाहेरच्या मोक्कार मंडळींचा मोठ्या प्रमाणात वावर तर आहेच शिवाय कर्मचाऱ्यांच्या खुर्च्यावर देखील ही मंडळी बसून बँकेचा कारभार हाकत असल्याचं पाहायला मिळू लागला आहे. यातून अडाणी गोरगरीब शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक मोठ्या प्रमाणावर केली जात असली तरी याचं सोयरसुतक शाखा व्यवस्थापक बिडकर यांना नसल्याचं दिसू लागला आहे.
डीसीसी बँकेचा भ्रष्टाचार नेहमीच चर्चेचा विषय बनत आला आहे. सध्या राजकीय डावपेचामुळे ही बँक प्रशासकाच्या हाती गेली आहे. किमान प्रशासक आल्यानंतर तरी कारभार सुधारेल सर्व सामान्य जनतेच्या अडचणी सोडविल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र प्रशासकांच कर्मचाऱ्यावर नियंत्रण नसल्यामुळे बँकेच्या कारभारात कुठलीही सुधारणा झालीच नाही. चौसाळा शाखेत तर खरोखरच कर्मचारी कोण असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मोक्कार लोकांचा राबता बँकेत मोठ्या प्रमाणावर आहे. बापाची जहागिरी समजून ही मंडळी बिनधास्त कर्मचाऱ्यांच्या खुर्च्यांवर जाऊन बसतात. बँकेच्या कामकाजात ढवळा ढवळ देखील मोठ्या प्रमाणात करतात. परिणामी ग्राहकांच्या न्याय अधिकारावर गदा येते. यातून अडाणी शेतकरी बँकेत आलाच तर त्याची आर्थिक पिळवणूक देखील केली जाते. यातूनच शाखा व्यवस्थापकाने क्षूल्लक त्रुटी काढून ग्राहकास वापस पाठवले जाते. बँकेत बसलेली मोक्कार मंडळी अशा ग्राहकास मी तुझं काम करतो थोडासा खर्च कर असं म्हणत त्या ग्राहकाचं काम करून देतात. परिणामी सर्वसामान्य शेतकऱ्यांना बँकेचा कर्मचारी कोण असा प्रश्न उपस्थित होतो. बँकेचे कामकाज करण्यासाठी चार दोनशे रुपये खर्च आला तरी जाऊ द्या काम तर झालं यात समाधान मानून तक्रारी करण्यास शेतकरी धजावत नाही. शाखा व्यवस्थापक बिडकर अशा मोक्कार मंडळींना जवळ करत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आर्थिक पिळवणुकीला चालना मिळत आहे. शाखा व्यवस्थापकावर कारवाईचा बडगा उगारून बँकेचा कारभार लोकाभिमुख करण्यासाठी प्रशासक उपाययोजना करतील की नाही याकडे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment