Wednesday, February 9, 2022

भाशिप्र संचालक मंडळाच्या वतीने अॅड.मकरंद पत्की यांचा दिनदयाळ बॕकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न



https://vichakshan.com/vichakshan_ek_nai_soch/assets/uploads/IMG-20220208-WA00501.jpg

अंबाजोगाई  : दीनदयाळ बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ॲड.मकरंद पत्की यांचा भाशिप्र संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ॲड. मकरंद पत्की यांची निवड करण्यात आली. त्याबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे, सहकार्यवाह प्रा.चंद्रकांत मुळे, शरयु हेबाळकर, शिक्षक प्रतिनिधी अप्पाराव यादव यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी बिपिन क्षिरसागर यांची दीनदयाळ बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच, रामभाऊ कुलकर्णी यांना पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी डॉ.अतुल देशपांडे,श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक महेशराव कस्तुरे, उपमुख्याध्यापक नंदकिशोर झरीकर, रा.तु.वखरे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment