Wednesday, February 9, 2022

लाचखोर मंडळ अधिकारी मारोती मेखाले च्या एसीबी पथकाने आवळल्या मुसक्या. एसीबीच्या जाळ्यात आडकण्याची ही दुसरी वेळ.


* कोर्ट ऑर्डर असूनही वारसदारांकडे मागत होता २,००० हजार रुपयांची लाच !

 


मुखेड (प्रतिनिधी ) : वडिलोपार्जित शेत जमीन वारसा हक्काप्रमाणे मुलाच्या व इतरांच्या नावावर करण्यासाठी मंडळ अधिकारी मारुती किशन मेखाले याने तक्रारदार यांचेकडे २,००० हजार रुपयांची लाच मागितली होती.परंतु लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने नांदेड गाठून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक यांच्याकडे 4 फेब्रुवारी रोजी लाच मागत असल्याची रितसर लेखी तक्रार केली होती. 5 फेब्रुवारी रोजी तक्रारीची पडताळणी केली असता त्यात लाच मागितल्याचे सिद्ध झाले.एसीबीच्या पथकाने आरोपी मेकालेला ताब्यात घेऊन त्याचे विरुद्ध मुखेड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महसूल विभागातील एक बडा मासा दुस-यांदा एसीबीच्या (Anti Corruption Bureau ) गळाला लागल्याने लाचखोरांच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.मारुती किशनराव मेखाले (वय -57) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या लाचखोर मंडळ अधिकाऱ्यांचे नाव आहे.

लाचखोर मेखाले हा मुखेड तालुक्यातील चांडोळा येथे मंडळ अधिकारी पदावर कार्यरत आहे.समोरच्या पार्टीकडून २०-२५ हजार खाऊन लाचखोर मेकाले जिमिन वारसाने लावण्यास टाळाटाळ करीत होता.शेवटी तक्रारदार यांना कोर्टात जावे लागले.अशी माहिती मिळाली आहे.कोर्टाची ऑर्डर आणून देखील लालची महालाचखोर मारोती मेखाले हा वारसदारांकडे फेर घेण्यासाठी लाचेची मागणी करु लागल्यामुळे लाचखोराला वेतागून शेतकरी पुत्राने नांदेड एसीबीचे ऑफिस जवळ केले आणि लाचखोराला एसीबीच्या हवाली करुन टाकले.

एसीबीच्या अधिका-यांनी कोर्ट ऑर्डर पाहून त्याप्रमाणे लाचखोर मंडळ अधिकारी मारोती मेखालेला  लगेच जाग्यावर फेर घ्यायला लावला.त्यामुळे तक्रारदार शेतकऱ्याने एसीबीच्या पथकाचे आभार व्यक्त केले आहेत.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉक्टर राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक धरमसिंग चव्हाण, उपअधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद हिंगोले, एकनाथ गंगातीर्थ, सचिन गायकवाड, अंकुश गाडेकर, आकाश गायकवाड, मारुती सोनटक्के यांनी केली.

शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment