
अंबाजोगाई : दि महाराष्ट्र स्टेट को.ऑप मार्केटिंग फेडरेशन लि.चे चेअरमन तथा आमदार बाबासाहेब पाटील हे अंबाजोगाई येथे आले असतांना त्यांनी अंबाजोगाई पीपल्स को ऑप बँक लि अंबाजोगाई येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी अंबाजोगाई पीपल्स बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी, संचालक अॅड विष्णुपंत सोळंके, महेश अर्बन बँकेचे संचालक शिवानंद हेंगणे, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, जि. प. सदस्य माधवराव जाधव उपस्थित होते.
यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी राजकिशोर मोदी चालवीत असलेल्या अंबाजोगाई पीपल्स को ऑप बँक तसेच विविध संस्था आणि अंबाजोगाई नगर परिषदेमार्फत केलेल्या विकास कामाचे कौतुक व अभिनंदन केले. याप्रसंगी नगरसेवक धम्मा सरवदे, दिनेश भराडिया, सुनील व्यवहारे, सुनील वाघळकर, विजय रापतवार, सचिन जाधव, खलील जाफरी, कैलास कांबळे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment