Monday, March 15, 2021

बीड जिल्हातील व्यापाऱ्यांचा बंद ला विरोध ! कडक निर्बंध लावून परवानगी द्या !!

    


बीड - (प्रतिनिधी) जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची अँटिजेंन टेस्ट केल्यानंतर देखील प्रशासनाने व्यापरपेठ आणि हॉटेल बार रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश दिले आहेत,त्याला व्यापाऱ्यांनी विरोधकेला असून लाखो रुपये कर्ज घेऊन सुरू केलेला व्यवसाय अशाने डबघाईला येईल,त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लावून हे व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी व्यापारी महासंघाने केली आहे .

बीड शहरात कोविड-19 संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व व्यापार्‍यांची कोविड-19 अ‍ॅन्टीजन टेस्ट करणे बाबत जिल्हाधिकारी यांनी व्यापारी प्रतिनिधींची बैठक बोलाविलेली होती त्या बैठकीमध्ये त्यांनी आवाहन केले होते की, शहरातील सर्व व्यापार्‍यांची अ‍ॅन्टीजेन टेस्ट करुन घ्यावी जेणेकरुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल त्या अनुषंगाने शहरातील जवळपास सर्वच व्यापारी संघटनेने या आव्हानाला प्रतिसाद देत ही टेस्ट करुन घेतलेली आहे.


जिल्हाधिकारी यांनी 13/03/2021 रोजी आदेश काढुन असे निर्देशित केले आहे की, शहरातील सर्व रेस्टॉरंट, खानावळ, बार, पान टपरी या अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवावे. परंतु मा. साहेब आपण जर या सर्व व्यावसायिकांचा व्यापार अनिश्चित कालावधी बंद केल्यास त्यांना एकतर फार मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. जर आपण या व्यावसायिकांना कडक निर्बंध घालून व्यवसाय चालु करण्यास परवानगी दिल्यास हे व्यापारी आपण आदेशित केलेल्या नियमांचे पालन करतील व कोरोना प्रादुर्भाव रोखण्यास सहकार्य देखील करतील व आपला व्यवसाय देखील गर्दी न होता करतील.
जिल्हाधिकारी यांनी अनिश्चित कालावधी साठी बंद करण्यात आलेले व्यवसाय कोविड-19 चे नियमांचे बंधन घालुन सुरु करण्यास परवानगी द्यावी.
मागील 1 वर्षापासून व्यापारी कोविड-19 संसर्गामुळे कधी व्यापार चालु तर कधी बंद मुळे त्याच्या व्यापारावर परिणाम झालेला तर आहेच वरुन कामगारांच्या पगार, जागाभाडे, बँक कर्ज मुळे तो आज आर्थिक झळ सोसत आहे.
व्यापारी बांधवांची सध्या सुरु असलेल्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये कोरोना बाधित व्यापार्‍यास गृह विलगीकण देणे असे आपल्या बैठकीमध्ये ठरले होते ते दिल्यास व्यापारी बंधुना सोयीचे ठरेल

No comments:

Post a Comment