पाटोदा ( प्रतिनिधी) तालुक्यातील पारगाव (घुमरा) येथे एकाचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि. 23 रोजी  घडली. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  शहाजी भुजंगराव भोसले असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

पारगाव घुमरा येथील शेतकरी शहाजी भोसले वय वर्ष 52 शेतामध्ये दररोज प्रमाणे जेवन करुन  संध्याकाळी झोपण्यासाठी गेले होते. ते शेतातील गोठ्याजवळ खळ्याच्या बाजूस  झोपले असता रात्री विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला म्हणून ते उठून जवळील त्यांच्या गोठ्याकडे जात असताना त्यांच्या अंगावर वीज पडून ते जागीच ठार झाले.
दरम्यान सकाळी ते घरी दूध घेऊन कसे परत आले नाहीत हे पाहण्यासाठी घरचे गेले असता मृतावतेस्थत आढलून आले. त्यांच्या पश्यात पत्नी व त्यांचे भाऊ व दोन मुले असा त्यांचा परिवार आहे.

गेल्या दोन दिवसापासुन जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाका सुरु असुन यात अनेकांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यात एकाचा बळी गेला आहे.