Monday, March 29, 2021

पुण्यात 16 वर्षीय मुलीवर गँगरेप; पिडीतेवर गोळीबार केल्याने प्रकार उघडकीस, 5 जणांवर गुन्हा दाखल.


पुणे : पुण्यातील सहकारनगर भागातील एका अल्पवयीन मुलीवर सराईत गुन्हेगार आणि त्याच्या साथीदारांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किळसवाणा प्रकार म्हणजे या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिला आणखी दोघेजण येणार असल्याचे सांगत थांबविण्याचा प्रयत्न केला. पण तीने विरोध करत निघून जात असताना तिच्यावर गोळी झाडण्यात आली आहे. गोळीबाराने हा सामूहिक बलात्काराचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने पोलीस दलासह शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी 16 वर्षीय मुलीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार 5 जणांवर अपहरण, बलात्कार तसेच इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गेल्या आठवड्यात वारजेत घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी जनता वसाहत परिसरात राहते. दरम्यान, गेल्या आठवड्यात तिच्या एका मैत्रिणीने तिला आपल्याला मित्राच्या वाढदिवसाला जायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार या दोघी वारजेत वाढदिवसाला गेल्या. त्याठिकाणी वाढदिवस साजरा झाल्यानंतर त्या मुलीला एका खोलीत नेण्यात आले. तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर मुलगी घरी जाण्यास निघाली. पण, आरोपींनी तिला घरी जाऊ नकोस, आणखी दोघे येणार आहेत, असे सांगितले. तिने या आरोपींना नकार दिला आणि घरी जाण्यास निघाली. यावेळी तिने मोबाईल छातीजवळ ठेवला. तसेच निघाली. यावेळी आरोपींने पोट माळ्यावर ठेवलेले बंदूक काढली व तिच्यावर गोळी झाडली. गोळी तिच्या छातीत लागली. पण तिथे मोबाईल असल्याने तिला जास्त जखम झाली नाही. यानंतर आरोपी घाबरले. त्यांनी त्या दुसऱ्या मैत्रिणीला या मुलीला घेऊन जाण्यास सांगितले. तिला रुग्णालयात देखील नेले नाही. त्या दोघींना कात्रज परिसरात सोडण्यात आले. त्या तरुणीने तिच्यावर याठिकाणी उपचार केले. यानंतर त्या घरी आल्या.

अशी झाली घटना उघड
गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पथक गस्त घालत असताना त्यांना आरोपींकडे पिस्तुल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्यांना पकडले. त्यांना हे पिस्तुल कोठून आणले आणि कुठे याचा वापर केला याची माहिती मिळवण्यासाठी पोलीसी खाक्या दाखवला. यावेळी या सामूहिक बलात्कार व गोळीबाराचा भांडाफोड झाला. त्यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन मुलीचा शोध घेत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर घडलेल्या गोळीबाराने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. गुन्हे शाखेने हे आरोपी ताब्यात घेतले आहेत.

मोबाईल ने वाचवला जीव…
अल्पवयीन मुलगी आरोपींच्या तावडीतून घरी जाण्यास निघाली. त्यावेळी तिने मोबाईल छातीजवळ ठेवला होता. आरोपीने रागात तिच्या छातीवर गोळी झाडली. पण ती मोबाईलला लागली आणि त्यानंतर तिच्या छातीत लागली. यामुळे तिला जास्त गंभीर जखम झाली नाही. आणि तिच्यावर रुग्णालयात न जाता उपचार झाले. फक्त मोबाईलमूळे या अल्पवयीन मुलीचा जीव वाचला

 असल्याचे सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment