बीड (प्रतिनीधी):- बीड जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठीच जिल्हा प्रशासनाने बीड जिल्ह्यात१० दिवसांचे लॉकडाऊन केलेले आहे. मात्र बीड शहरात काही तरुण कारण नसताना घराबाहेर पडत असून दुचाकीवर सर्वत्र फिरत आहेत. बीड शहरात विनाकारण फिरण्यार्या हौशी तरुणांना, पोलिस प्रशासनाकडुन चांगलाच चोप देण्यात आला.
काही कारण नसतांना विनाकारण बाहेर पडणं या तरुणांना चांगलंच महागात पडलंय. शहरातील खासबाग, बशीरगंज ,शिवाजी महाराज चौक यासह अनेक भागात हौशी तरुण मंडळी विनाकारण दुचाकीवर बाहेर फिरत होती.याच विनाकारण फिरणाऱ्यांना काठीचा काठीचा प्रसाद मिळालाय.
No comments:
Post a Comment