* राज्यातील कोरोना संक्रमितांचं प्रमाण कमी होत नाहीये. राज्यात आज 35,726 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 26,73,461 झालीय.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, सरकारकडूनही अनेक निर्बंध लादले जात आहेत. आता राज्यात जमावबंदी लागू केले आहेत. तरीही राज्यातील कोरोना संक्रमितांचं प्रमाण कमी होत नाहीये. राज्यात आज 35,726 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 26,73,461 झालीय.
* राज्यात आतापर्यंत एकूण 23,14,579 कोरोना बाधित रुग्ण बरे.
राज्यात आज 14,523 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, राज्यात आतापर्यंत एकूण 23,14,579 कोरोना बाधित रुग्ण बरे झालेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 86.58 % एवढे झालेय. आज राज्यात 35,726 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 166 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली.
सध्या राज्यातील मृत्युदर 2.02% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,91,92,750 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 26,73,461 (13.93 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत. सध्या राज्यात 14,88,701 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर 15,644 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात 35,7326 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 26,73,461 झाली आहे. राज्यात आज एकूण 3,03,475 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
* राज्यात आजपासून रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदी.
राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून त्याबाबतची नवी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीत चौपाट्या, उद्योने, मॉल, सिनेमागृह यांसाठीही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारने आजपासून रात्री 8 ते पहाटे 7 वाजेपर्यंत जमावबंदी लागू केली आहे. हा निर्णय 15 एप्रिल 2021 पर्यंत लागू असेल.
1) सार्वजनिक उद्यानं, समुद्र किनारे रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहील. या नियमाचं कुणी उल्लघंण केलं तर एक हजाराचा दंड बसेल.
2) नव्या नियमावलीनुसार सिनेमा हॉल, सभागृह, रेस्टॉरंट रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहतील. पण त्यांची होम डिलिव्हरी सुरु राहील.
3) सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय तसेच धार्मिक कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली आहे.
4) लग्नासाठी फक्त 50 लोकांना तर अंतिम संस्कारासाठी फक्त 20 लोकांना परवानगी देण्यात आली आहे.
5) अत्यावश्यक सेवेतील कार्यालये वगळता इतर खासगी कार्यालयात 50 टक्के उपस्थिती ठेवण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत.
6) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था काही निर्बंधासह सुरु राहील, असंही नियमावलीत स्पष्ट करण्यात आलं आहे,
7) धार्मिक स्थळ आणि त्यांच्या ट्रस्टींनी कमीत कमी भाविकांना मंदिरात दर्शन कसे देता येईल यावर लक्ष केंद्रीत करणे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच शक्यतो ऑनलाईन दर्शनाची सुविधा देण्यात यावी. तसेच मंदिरात येणाऱ्यांनी कोरोना नियमांची त्रिसूत्री पाळली की नाही ते पाहूनच त्यांना मंदिरात प्रवेश देणे, अशी सूचना देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment