- आज धुलीवंदनाचा दिवस, कृष्णपक्ष प्रतिपदा
- जाणून घ्या कसा जाईल आपला आजचा दिवस?
- काय आहे आपले आजचे भविष्य.
आजचे राशी भविष्य २९ मार्च २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?
- मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊन आणि व्यावहारिक विचार करुन निर्णय घेणे हिताचे राहील. तब्येतीचे रागरंग ओळखून निर्णय घ्या. शुभ रंग - लाल. शुभ अंक - ९.
- वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: हट्ट टाळा. शांतपणे विचार करुन निर्णय घ्या. भावनेच्या आहारी वाहून जाणार नाही याची काळजी घ्या. तब्येत सांभाळा. शुभ रंग - निळा. शुभ अंक - ६.
- मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस. थेटपणे आणि मोकळेपणाने बोला. संवाद साधणे हिताचे राहील. गोड बोलून काम साधू शकाल. शुभ रंग - मोरपिशी. शुभ अंक - ५.
- कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: संयम पाळणे हिताचे राहील. अती घाई संकटाकडे नेई हे लक्षात ठेवा. महत्त्वाचे निर्णय जाणकारांच्या सल्ल्याने घेणे हिताचे राहील. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवणे हिताचे आहे. शुभ रंग - चंदेरी. शुभ अंक - २.
- सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: कोणालाही वचन देणे, कर्जाला तारण राहणे, लेखी करार करणे आजच्या दिवशी टाळणे हिताचे राहील. दिवस आनंदात जाईल. स्वतःची काळजी घ्या. शुभ रंग - जांभळा. शुभ अंक - १.
- कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: तब्येतीची काळजी घ्या. कुपथ्य होणार नाही याचे भान बाळगा. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे हा विचार अंमलात आणण्याचा हा दिवस आहे हे लक्षात ठेवा. शुभ रंग - पोपटी. शुभ अंक - ५.
- तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. भावनिक होऊन निर्णय घेणे टाळा. खरेदी-विक्रीचे व्यवहार आजच्या दिवशी टाळा. शुभ रंग - आकाशी आणि पांढरा. शुभ अंक - ६.
- वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: विश्रांतीचा आणि स्वतःला वेळ देण्याचा दिवस आहे हे लक्षात ठेवा. आपल्या छंदासाठी, आवडीनिवडीसाठी वेळ काढणे हिताचे आहे. शुभ रंग - गुलाबी. शुभ अंक - ९.
- धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: भावनेच्या भरात निर्णय घेणे टाळा. कालाय तस्मै नमः हा मंत्र लक्षात ठेवून वागा. व्यावहारिक राहून वागणे हिताचे आहे. शुभ रंग - सोनेरी. शुभ अंक - ३.
- मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: धार्मिक, अध्यात्मिक कार्यासाठी दिवस चांगला आहे. शुभ कार्य करण्यासाठी उत्तम दिवस. थोरांचे आशीर्वाद लाभतील. ज्येष्ठांचा आदर करा आणि त्यांचा सल्ला ऐकून घेऊन नंतर सारासार विचाराने निर्णय घेण्याची सवय लावून घेणे हिताचे आहे. शुभ रंग - काळा. शुभ अंक - ८.
- कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे या विचाराने काम करा. प्रयत्न करणे आपल्या हाती असल्यामुळे प्रामाणिक प्रयत्न करा. मन उत्साही राहील. आनंदात राहाल. शुभ रंग - निळा. शुभ अंक - ८.
- मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: स्वतःवर विश्वास ठेवून विचारपूर्वक निर्णय घेणे हिताचे आहे. कोण काय बोलेल यापेक्षा आपल्या हिताला प्राधान्य देणे फायद्याचे ठरेल. गोड बोलून स्वार्थ साधू पाहणाऱ्या लोकांपासून दूर राहणे हिताचे आहे. तब्येतीची काळजी घ्या. शुभ रंग - सोनेरी. शुभ अंक - ३.
No comments:
Post a Comment