* देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील -पवार !
नवी दिल्ली – राज्याच्या राजकारणात भूकंप घडवणाऱ्या लेटरबॉम्ब वर बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकप्रकारे गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण करत त्यांच्या राजीनाम्या बाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील अस सांगून परमवीर सिंग यांनी आजच हे पत्र का लिहिले असा सवाल केला .त्याचसोबत या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली .या प्रकरणाचा सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम होणार नाही असं देखील पवार यांनी स्पष्ट केलं .
नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना पवार यांनी हे सगळं प्रकरण गंभीर असल्याचं सांगत देशमुख किंवा मुख्यमंत्री यांनी सचिन वाझे यांची नियुक्ती केली नव्हती तर ती परमवीर सिंग यांनी केली होती अस म्हणत या दोघांना क्लिनचिट देण्याचा प्रयत्न केला आहे .
No comments:
Post a Comment