लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब जयंती व राष्ट्रनेते शरद पवार साहेब वाढदिवसानिमित्त विनम्र अभिवादन
शिवकुमार केदारी, हिंद नगर, परळी वैजना
🌾✨ *“महाराष्ट्राला लाभलेली दोन दीपज्योती*” ✨🌾
१२ डिसेंबरची तारीख आली, महाराष्ट्र झाला उजळून,
दोन रत्नांचा जन्म दिवस, जनतेच्या हृदयात रूजले खोलून.
एक मातीतून उठलेला, धडाडीचा लोकनेता मुंडे,
शेतकऱ्याच्या वेदनेत जळणारे, लोकांच्या आवाजाचे हुंकार गुंडे.
बीडचा अभिमान, गावखेड्यातील मुलांचा आरसा,
वक्तृत्वाच्या तेजाने चमकणारा, निर्धाराचा पर्वत खरा-खुरा असा.
जनतेच्या अश्रूंना शब्द देणारा, न्यायासाठी लढणारा,
गोपीनाथ मुंडे नाव घेतल्यावर आजही महाराष्ट्र भरुन येणारा.
आणि दुसरीकडे जन्मलेले—राजकारणातील धुरंधर,
अनुभव, दूरदृष्टी, समतोल यांचे तेजस्वी अध्वर्यू—शरद पवार.
सत्तेत असो वा विरोधी बाकावर, प्रभाव त्यांचा तसाच दिसे,
महाराष्ट्र नाव उच्चारल्यावर, ‘शरद पवार’ हे नाव ठामपणे उभे राहीसे.
क्रिकेट असो वा राज्यकारभार, त्यांच्या हातात जादूची वाट,
पद्मविभूषणाने सन्मानलेला, राष्ट्रनेता खंबीर आणि मातृभूमीचा निस्सीम भक्त.
दोन भिन्न विचारांचे, पण महाराष्ट्रासाठी एकच ध्यास—
जनतेचा उज्वल विकास, आणि राज्याचा उन्नत श्वास.
या भूमीत एकाच दिवशी दोन महापुरुष जन्माला आले
हे महाराष्ट्राचे परम भाग्य—देवही इथे नतमस्तक झाले.
🙏 *विनम्र अभिवादन* 🙏
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांना जयंती दिनी शतशः श्रद्धांजली.
*राष्ट्रनेते शरदचंद्र पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व शतायुषी होवोत ही प्रार्थना*.
*✍️ *शिवकुमार केदारी*
*हिंद नगर, परळी वैजनाथ*
No comments:
Post a Comment