Tuesday, December 16, 2025

बीडमध्ये थरार! लग्न समारंभात पाहुणे बनून चोरी करणारी आंतरराज्य' टोळी गजाआड.


बीड (प्रतिनिधी) लग्न समारंभात पाहुणे किंवा भिकारी बनून दागिने चोरणे, तसेच अंगावर टोमॅटो सॉस टाकून नागरिकांचे लक्ष विचलित करत पाकीटमारी करणे, अशा आंतरराज्यीय गुन्ह्यांची 'मोडस ऑपरेंडी' (गुन्हा करण्याची पद्धत) असलेल्या टोळीला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने पाठलाग करून अटक केली आहे. मध्यप्रदेशातील या टोळीने बीड, अंबाजोगाई आणि गेवराई परिसरात धुमाकूळ घातला होता.

या पथकाने केली कामगिरी.

एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उपनिरीक्षक महेश विघ्ने, बप्पासाहेब घोडके, राजू पठाण, महेश जोगदंड, युनूस बागवान, भागवत शेलार, गणेश मराडे आदींनी केली. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

लग्नात लहान मुलेही करतात चोरी.

लग्न समारंभात याच सिसोदिया गँगमध्ये मोठ्यांसोबत लहान मुलेही असतात. नवरीच्या खोलीत अथवा गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या पर्स चोरी करण्याचे काम ही लहान मुले करतात. यापूर्वी बीड, आष्टीमध्ये असेच प्रकार घडले होते. तसेच छत्रपती संभाजीनगर पोलिसांनीही अशा प्रकारची टोळी पकडली होती. आता बीड पोलिसांनीही ही टोळी पकडली आहे. त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.

नंदुरबार जिल्ह्यात याच टोळीने बॅग लिफ्टिंग केली होती. तेच पैसे घेऊन हे चाेरटे बीड जिल्ह्यात आले होते. केजमध्ये एका बँकेत त्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. त्यामुळे ते बीड शहरात येत होते. परंतु त्या आधीच त्यांना मस्साजोगजवळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

No comments:

Post a Comment