केज (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावात अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ऊसतोडणीसाठी आपल्या मोठ्या बहिणीसोबत आलेल्या एका १२ वर्षीय बालिकेवर एकाने अत्याचार केला. याप्रकरणी युसूफवडगाव पोलिस ठाण्यात पोक्सोसह अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला असून, पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी कळंब बसस्थानकावरून जेरबंद केले आहे.
पीडित बालिकेचे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहे. तिचे वडील कर्नाटकात ऊस तोडणीसाठी गेले आहेत, तर आईची मानसिक स्थिती ठीक नसल्याने ती नातेवाइकांकडे असते. अशा परिस्थितीत ६ वीच्या वर्गात शिकणारी ही पीडित बालिका आपल्या ऊसतोड मजूर बहिणीसोबत केज भागात आली होती. तिची मोठी बहीण आणि दाजी धारूर तालुक्यातील एका मुकादमाकडून उचल घेऊन केजमधील एका गावात ऊसतोडणीसाठी आले होते. सोमवारी रात्री सर्व मजूर शेतात उसाचे ट्रॅक्टर भरण्यासाठी गेले होते.
No comments:
Post a Comment