* 21 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार पुरस्कार प्रदान.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : समाजासाठी निस्वार्थ वृत्तीने कार्य करणारे, सेवाभाव जपणारे आणि परळी वैजनाथ येथील वीरशैव लिंगायत समाजाचे जेष्ठ नेते दत्ताप्पा इटके गुरूजी यांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा (पुणे) तर्फे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. दत्ताप्पा इटके गुरुजी यांनी जीवनभर शिक्षण, संस्कार, धार्मिक व सामाजिक कार्यांद्वारे परळी तालुक्यात एक वेगळा ठसा उमटवला आहे.
दत्ताप्पा इटके गुरूजी यांनी गेल्या अनेक दशकांपासून समाजउद्धार, शिक्षण, संस्कार, सांस्कृतिक जपणूक, सामूहिक विवाह उपक्रम, गरजू कुटुंबांची मदत, आरोग्य शिबिरे, धार्मिक कार्यक्रम आणि समाजातील ऐक्य व एकात्म्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. समाजहितासाठी त्यांनी केलेल्या या मोलाच्या योगदानाची दखल घेत सभेच्या प्रदेश समितीने हा मानाचा पुरस्कार जाहीर केला असल्याचे सभेचे सरचिटणीस चंद्रशेखर (बाळासाहेब) होनराव यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
या पुरस्काराचा वितरण सोहळा दि. 21 डिसेंबर 2025 रोजी सप्तशृंगी गड, ता. कलवन, जि. नाशिक येथे संपन्न होणार आहे. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित असून परळी परिसरातूनही मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
*दत्ताप्पा इटके गुरुजींच्या कार्याचा विशेष उल्लेख*
या प्रसंगी परळी शहरातील विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणारे वैजनाथ विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय गणपतराव (दत्ताप्पा) इटके गुरुजी यांच्या कार्याचाही विशेष गौरव करण्यात आला. त्यांनी केलेले सामाजिक कार्य हे परळीच्या विकासाचा पाया मानले जाते.
त्यांच्या प्रमुख कार्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश-सन 1974 पासून परळी वैजनाथ येथे अतिरुद्र अभिषेकामध्ये सहभाग
विद्यार्थ्यांसाठी हनुमान व्यायाम शाळामार्फत व्यायाम प्रशिक्षण व संस्कार शिबिरांचे 30 वर्षे आयोजन
समाजातील बांधवांच्या ऐक्यसाठी बसवेशकॉलनीत 150 कुटुंबांना निवास व्यवस्था 1982 पासून 22 वर्षे सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन, 2000 गरीब कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह संपन्न
विविध शिवाचार्यांच्या अधिक मास व श्रावण मास अनुष्ठानांचे आयोजन
महात्मा बसवेश्वर जयंती सोहळे, वृक्षारोपण, महिला-पुरुष भजन स्पर्धा, रंगोळी स्पर्धा रक्तदान शिबिर, रक्तगट तपासणी व आरोग्य शिबिरे
वीरशैव समाजातील आचार्यांचे तपोधन कार्यक्रम परळी नगरपरिषदेत 15 वर्षे नगरसेवक, उपनगराध्यक्ष पदावर कार्य
श्री क्षेत्र कपिलधार येथे 10 कोटींचे विकास आराखडे मंजूर करण्यात महत्वपूर्ण भूमिका
No comments:
Post a Comment