Tuesday, December 16, 2025

अंबाजोगाई-लातूर रस्त्यावर भीषण अपघात.जीप-कारच्या धडकेत लातूरचे तिघे जागीच ठार.


अंबाजोगाई (प्रतिनिधी): बीड येथून लातूरकडे तर लातूर येथून बीडकडे जाणाऱ्या जीप व कारचा समोरा समोर अपघात होऊन तिघेजण जागीच ठार झाले, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. अपघातातील तीनही मयत लातूरचे आहेत. रात्री उशिरापर्यंत त्यांची ओळख पटलेली नव्हती. हा अपघात सोमवारी रात्री १०:३० वाजता तालुक्यातील बर्दापूर फाट्याच्या पुढे असलेल्या वळणाजवळ घडला.

ही जीप (एम.एच.२४ व्ही ४७७१) बीडकडून लातूरकडे जात होती, तर कार (एम.एच.१२ सी.वाय.७०२२) लातूरहून बीडकडे जात होती. या दोन्ही वाहनांची जोरदार धडक होऊन अपघातात कारमधील तीन युवक जागीच ठार झाले, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातस्थळी मोठी गर्दी जमली होती. जखमींना लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे बर्दापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment