परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहरातील सिद्धेश्वर नगर भागातील रहिवाशी सौ. मंदाकिनी सुधाकरराव शिंदे यांचे दिनांक 12 जून रोजी दुपारी 1:00 वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले असुन मृत्यू समयी त्यांचे वय 45 वर्ष होते.
याबाबत माहिती अशी की येथील सिद्धेश्वर नगर भागातील रहिवाशी सौ. मंदाकिनी सुधाकरराव शिंदे यांचे दिनांक 12 जून रोजी दुपारी 1:00 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 45 वर्ष होते. ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या, अतिशय धार्मिक तथा मनमिळाऊ स्वभावाच्या असणाऱ्या मंदाकिनी शिंदे या परिसरात सर्व सुपरिचित होत्या. त्यांच्या पश्चात पती, 1 मुलगा, 1 मुलगी आणि सासूबाई असा परिवार आहे. जागृती पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुधाकर शिंदे यांच्या त्या पत्नी होत. सौ. मंदाकिनी शिंदे यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक 13 जून रोजी सकाळी 8:00 वाजता सार्वजनिक समशानभूमी परळी वैजनाथ या ठिकाणी होईल. शिंदे परिवाराच्या दुःखात दैनिक कांतीकारी साथी. परिवार सहभागी आहे.
No comments:
Post a Comment