परळी वैजनाथ (प्रतिनिधी) सोमवार दिनांक 16 जून रोजी नायब तहसीलदार मा. परवीन पठाण मॅडम यांनी परळी तालुक्यातील मौजे संगम येथे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी सरपंच सौ. ज्योती रामेश्वर कोकाटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान कोकाटे कुटुंबाच्या वतीने नायब तहसीलदार परवीन पठाण मॅडम यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी पाणी फाउंडेशन पुरस्कार प्राप्त माजी सरपंच सौ. वच्छलाबाई वैजनाथराव कोकाटे, यावेळी अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे, बाल कीर्तनकार व भागवताचार्य ह.भ.प. जनाई महाराज कोकाटे, तलाठी पंडित साहेब, मुख्याध्यापक नाव वंदे सर शिंदे, मॅडम बडे मॅडम, द्वारका नवनाथ पवार, ग्रामपंचायत सदस्य अंकुश गिराम, श्रावणी कोकाटे, आनंदी कोकाटे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना नायब तहसीलदार परवीन पठाण मॅडम म्हणाल्या, “कोकाटे कुटुंब हे परळी तालुक्यातील एक आदर्श कुटुंब असून त्यांनी अध्यात्मिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या तिसऱ्या पिढीतील ह.भ.प. जनाई महाराज कोकाटे यांचे कीर्तन व प्रवचन हे नव्या पिढीला दिशा देणारे ठरत आहे असे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment