परळी वैजनाथ (प्रतिनिधी): संतशिरोमणी श्री नामदेव महाराज पालखी सोहळा, नरसी नामदेव ते पंढरपूर असा पायी मार्गक्रमण करत असून, २५ जून २०२५ रोजी पालखी परळी वैजनाथ येथे मुक्कामी येणार आहे. या पावन सोहळ्यानिमित्त, परळी नगरीत रिंगण सोहळ्याचे दिव्य आयोजन करण्यात आले आहे.
या रिंगण सोहळ्याचे आयोजन बुधवार, दि. २५ जून रोजी सायंकाळी ४ वाजता, नाथ रोडवरील जत्रा मैदानावर करण्यात आले असून, अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.
परळीतील भाविक भक्त, महिला भजनी मंडळे आणि पंचक्रोशीतील वारकरी बांधव मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. टाळ, मृदंग, अभंगगायन आणि "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय होणार आहे.
या वर्षी रिंगण सोहळ्याचे सलग चौथे वर्ष असून, परळीतील भाविक या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
नामदेव महाराजांच्या पादुकांची वारी, वारकऱ्यांचे सामूहिक गजर, भक्तिभावात न्हालेलं वातावरण आणि संतांच्या सेवेसाठी समर्पित परंपरा — हे सर्व परळीतील रिंगण सोहळ्यात अनुभवता येणार आहे.
परळीकरांसाठी ही एक आध्यात्मिक पर्वणीच ठरणार असून, भक्तिभावाने सजलेल्या या सोहळ्यात सहभागी होऊन संत नामदेव महाराजांच्या कृपेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांच्यासह तालुका अध्यक्ष विश्वंभर महाराज उखळीकर शहराध्यक्ष अशोक महाराज कराळे तालुका संपर्प्रमुख मंगेश महाराज मुंडे, बीड जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा राधिकाताई जायभाये, जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख चेतनाताई गौरशेटे, तालुकाध्यक्ष शोभाताई भास्करराव चाटे, शहराचे अध्यक्ष सुरेखाताई विजयकुमार मेनकुदळे, स्वातीताई ताटे अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळाच्या सर्व पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत प्रत्येक शाखेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे असे आव्हान तालुकाध्यक्ष शोभाताई भास्करराव चाटे यांनी केले आहे.
सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment