Friday, June 13, 2025

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा पहिला पत्रकारितेचा मराठवाडा भूषण पुरस्कार संपादक शेख मुजीब यांना जाहीर.मान्य वरांच्या हस्ते होणार वितरण.

बीड (प्रतिनिधी) पत्रकारितेच्या माध्यमातून गेली 12 वर्ष म्हणजेच तब्बल एक तप सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर बेधडक लेखनी चालवणार्‍या आणि वंचित, उपेक्षित घटकांना सातत्याने न्याय देण्याची भुमिका ठेवणार्‍या सायं.दै.बीड सिटीझनच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सायं.दै.सिटीझनचे संपादक शेख मुजीब शेख खाजा यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने पत्रकारितेतील पहिला दर्पणकार मराठवाडा भुषण 2025 पुरस्कार जाहीर झाला आहे. रविवार दि.15 जुन रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार्‍या सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे प्रदेश संपर्क प्रमुख वैभव स्वामी यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई मराठवाडा विभागाच्या वतीने पत्रकार संघाचे मराठवाडास्तरीय रौप्य महोत्सवी अधिवेशन आणि मराठवाडा भुषण पुरस्कार सोहळा 2025 चे आयोजन रविवार दि.15 जुन रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंग मंदीर उस्मानपुरा येथे करण्यात आले आहे. कार्यक्र्रमाचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून प.पु.1008 महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज, नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, जालन्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे, हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ, परभणीच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, राज्यसभेचे खा.डॉ.भागवत कराड, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आ.प्रदिप जैस्वाल, आ.प्रशांत बंब, आ.संजय केनेकर, आ.संजनाताई जाधव, आ.अनुराधाताई चव्हाण, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडलाचे अध्यक्ष जयदिप कवाडे, जेष्ठ पत्रकार मधुकरआण्णा वैद्य, माजी महापौर नंदकुमार घोडेले, डिजीटल मिडियाचे प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे तर विशेष अतिथी म्हणून एबीपी माझ्याच्या संपादीका सरिताताई कौशिक, प्रसिध्दी अभिनेते योगेश सिरसाट, बंगरूळूच्या पुर्णब्रम्ह प्रशासकीय संचालिका जयंतीताई कठाळे यांची उपस्थिती राहणार आहे. पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे, प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, प्रदेश सरचिटनीस डॉ.विश्वास आरोटे, प्रदेशउपाध्यक्ष अशोक देडे, प्रदेश संपर्क प्रमुख वैभव स्वामी, राज्यसमन्वयक नितीन शिंदे, प्रदेश प्रसिध्दीप्रमुख नवनाथ जाधव, कार्याध्यक्ष निलेश सोमानी आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सकाळी 10 वाजता भारतीय माध्यमांचा डीएनए कोणता ? माध्यमांचे भूत, वर्तमान आणि भविष्य या विषयावर परिसंवाद आयोजीत करण्यात आला आहे. यामध्ये संवादिका अश्विनीताई डोके यांच्यासह एबीपी माझ्याच्या संपादिका सरिताताई कौशिक, माजी कुलगुरू सुधीर गव्हाणे, प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे, संजय सोनवणी, अ‍ॅड.महेश भोसले, अविनाश वानखेडे आणि अ‍ॅनालायझरचे संपादक सुधीर कुलकर्णी हे वक्ते सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष अनिल सावंत, जिल्हाध्यक्ष डॉ.छबुराव ताटे यांच्यासह महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे छत्रपती संभाजीनगर येथील सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

संपादक शेख मुजीब यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव..💐💐💐

सायं दैनिक सिटीजनचे संपादक शेख मुजीब यांनी एक टपरी चालक ते दैनिकाचा संपादक असा यशस्वी प्रवास केल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचा पत्रकारितेमधून दर्पणकार मराठवाडा भूषण 2025 जाहीर करण्यात आला. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या संपादकाची निवड पत्रकार संघाच्या राज्यकारणीने मान्य केल्याबद्दल पत्रकार संघाच्या बीड जिल्हा शाखेच्या वतीने शाल, श्रीफळ, पेढा भरवून अभिनंदन करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे राज्याचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांच्यासह बीड जिल्हाध्यक्ष अमजद खान, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष शेख ताहेर, महिला जिल्हाध्यक्ष शेख आयेशा यांच्यासह ग्रामीणचे बीड जिल्हाध्यक्ष अँड विनायक जाधव, बीड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दीपक काळकुटे, बीड जिल्हा सचिव शेख वसीम, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा सचिव शेख अब्दुल, जिल्हा संघटक रईस खान, उपाध्यक्ष शेख आयुब, महिला सचिव अनुप्रिता मोरे, ज्येष्ठ मुक्त पत्रकार युसुफ भाई, ज्येष्ठ समाजसेवक रमेश गंगाधरे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. या निवडीबद्दल जिल्ह्यातील पत्रकारांसह विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment