*भव्य दिव्य रिंगण सोहळयाने भाविकांच्या डोळयाचे पारणे फेडले.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) आषाढी एकादशीच्या निमित्याने नर्सी नामदेव येथून पंढरपूरसाठी निघालेल्या संत नामदेव महाराजांच्या पालखीचे तीर्थक्षेत्र परळी वैजनाथ नगरीत आज शुक्रवार दिनांक 5 जुलै रोजी आगमन रिंगणत 4 वाजता झाले.
टाळ, मृदंगाच्या निनादात पालखी मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत असताना मंगलमयी वातावरणाने परिसर भारून गेला होता. तर पालखीचा रिंगण सोहळा नेत्रदीपक ठरला.अ.भा.वारकरी भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे व त्यांच्या सहकार्यांच्या वतीने हा पालखी सोहळयाने भव्य दिव्य डोळयांचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा परळीकरांनी पाहिला.
संत नामदेवांच्या जन्मस्थळापासून निघालेल्या पालखीचे पंढरपूरपर्यंत जाण्यासाठी एकूण 22 टप्पे होतात. यातील एक टप्पा हा पंचम ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ येथे आहे. परळी वैजनाथ नगरीत दुपारी पालखी दाखल झाली होती. अ.भा.वारकरी भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे व त्यांच्या सहकार्यांच्या वतीनेे पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी महिलांनी पूजा करून पालखीचे दर्शन घेतले. विविध मान्यवरांनीही पालखीच्या स्वागतासाठी हजेरी लावत दर्शन घेतले. हाती भगवी पताका घेवून अगदी शिस्तीत जाणारे वारकरी, टाळ -मृदंगाचा गजर यामुळे भक्तीमय वातावरण झाले होते.
त्यानंतर नाथरोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जत्रा मैदानावर पालखी पोहोचली. तेथे वारकर्यांनी भजने गात सर्वांचीच मने जिंकली. तर रिंगणामध्ये मानाचा असलेला संत नामदेव महाराज यांचा अश्व धावल्यानंतर इतर अश्व धावले. तर घोडेस्वारांनी यावेळी विविध कवायती सादर केल्या. काळजाचा ठोका चुकविणार्या या कवायती टिपण्यासाठी अनेकांचे कॅमेरे सरसावले होते. या कार्यक्रमास अ.भा.वारकरी भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे व त्यांच्या सहकार्यांनी व नगर परिषद, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचार्यांनी अथक परिश्रम घेतले.
एकंदरीत ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषाने परळी वैजनाथ नगरी दुमदुमली होती. पालखीचे स्वागत करण्यासाठी विविध राजकीय, सामाजिक धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील सदस्य, पदाधिकारी मंडळी तसेच परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.
चौकट
*उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने ‘पांडुरंगाच्या द्वारी; आरोग्याची वारी’*
*वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर*
‘पांडुरंगाच्या द्वारी; आरोग्याची वारी’ या संकल्पनेतून परळी उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक अरुण गुट्टे यांच्या सौजन्याने व अ.भा.वारकरी भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह भ प श्री रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ सुमारे १५०० वारकऱ्यांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यावेळी संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांच्या पालखीतील सर्व वारकऱ्यांना उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने मोफत औषधे देण्यात आली.अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळ महिला मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांकडून दिंडीतील वारकरी महिलांचे ही स्वागत करण्यात आले रिंगण सोहळ्यास विविध महिला भजनी मंडळानी व कन्हैया अध्यात्मिक वारकरी संस्थेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन रिंगण सोहळ्यात सहभाग घेतल्यामुळे रिंगण सोहळा नेञदिप झाला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने वारकऱ्यांना लिंबू सरबत चे वाटप करण्यात आले. सर्वांचे स्वागत तालुकाध्यक्ष विश्वांभर महाराज उखळीकर व आशोक महाराज कराळे यांनी केले तर आभार जिल्हाध्यक्षा सौ.राधिकाताई जायभाये व जिल्हा सचिव सौ.चेतनाताई गौरशेटे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment