१. शाळेतून परत येत असतांना तेजस कटारे, रत्नेश्वर ठोंबरे आणि अन्य १ मुलगा यांनी दर्ग्याच्या परिसरातील असलेल्या झाडावरील जांभळे तोडून खाल्ली. त्या वेळी मौलवी मुजीब शेख आणि त्याचा साथीदार समीर अत्तार कासम तेथे आले आणि त्यांनी काठीने तिघांना अमानुष मारहाण करण्यास आरंभ केला.
२. या वेळी मौलवी शेख याने तेजस याच्या डोक्यावर काठी मारली, त्याला भूमीवर आपटले, तसेच त्याचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला. यामुळे तो गंभीर घायाळ झाला. रत्नेश्वरही घायाळ झाला, तर अन्य १ घायाळ मुलगा मौलवी आणि कासम यांच्या कह्यातून निसटून पळून गेला.
३. तेजस याला रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र उपचार घेतांना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आईने केलेल्या तक्रारीवरून मौलवी मुजीब शेख याला अटक करण्यात आली, तर समीर अत्तार कासम पसार झाला आहे.
No comments:
Post a Comment