बीड (प्रतिनिधी) देशभरातील लोकसभा व विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना 2029 साली होणार असून येत्या 2026 साली मतदार संघाची पुनर्रचना होणार आहे. त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ होणार आहेत.जवळपास 50 वर्षानंतर केज विधानसभा मतदारसंघ 'आरक्षण मुक्त ' होईल असे सांगितले जात आहे. तर अंबाजोगाई हा स्वतंत्र मतदार संघ होणार आहे.
. यापूर्वी सन 2009 साली मतदार संघाची पुनर्रचना झाली होती. त्यापूर्वी सन 1980 साली केज विधानसभा मतदारसंघ आरक्षित झाला. सन 2009 साली मतदार संघाची पुनर्रचना झाली. त्यावेळी त्या समितीमध्ये लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे हे समितीचे सदस्य होते. 2009 साली केज विधानसभा मतदारसंघ पुन्हा आरक्षित झाला. आता मतदारसंघाला 2029 ची प्रतीक्षा लागली आहे. परंतु त्यापूर्वीची 2024 ची निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली आहे. यावेळी केज विधानसभा मतदारसंघ आरक्षित राहण्याची शेवटची वेळ आहे. अंबाजोगाई केज,नेकनुर व इतर गावांमधील प्रस्थापित नेते केज मतदार संघ खुला कधी होतो? याची वाट पाहत आहेत.2029 साली केज विधानसभा खुला होईल असे सांगितले जात आहे. मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा प्रत्यक्ष कार्यक्रम
सन 2026 साली होणार आहे. त्याच कालावधीत फेर रचना करण्यात येईल.त्याच कालावधीत फेररचना, आक्षेप व इतर सोपस्कार पूर्ण केले जातील .बीड जिल्ह्यात सध्या सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात केज, बीड, परळी, गेवराई, आष्टी, माजलगाव चा समावेश आहे.सन 2009 साली लोकसभेचे मतदार होते 16 लाख आता ती संख्या 21 लाखावर पोहोचली आहे. विधान विधानसभा मतदारसंघात सुद्धा मतदारसंख्या वाढली आहे. बीड जिल्ह्यात सर्वात जास्त मतदार संख्या ही केज विधानसभा मतदारसंघात आहे. जिल्ह्यात केज वगळता पाच मतदार संघ हे जवळपास तीन लाखाच्या आसपास आहेत.मात्र केज विधानसभा मतदारसंघात जवळपास 3 लाख 76 हजार एवढे मतदार असल्याचे उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे यांनी सांगितले . सध्या मतदार नोंदणी सुरू आहे.चार लाखाच्या आसपास मतदार केज विधानसभा मतदारसंघात आहे. आता पुनर्रचनेत जिल्ह्यात सात मतदारसंघ होणार आहेत.पूर्वीचे गेवराई,बीड, माजलगाव, परळी, आष्टी मतदार संघ तसेच राहतील. परंतु जिल्ह्यातील 21 लाख मतदारांची विभागणी करून ती समप्रमाणात घेण्यात येईल व एका विधानसभा मतदारसंघाची वाढ होईल. त्यामध्ये केज व अंबाजोगाई हे स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ होतील.दोन्ही तालुक्यातील मतदारांची संख्या ही लक्षणीय आहे. अंबाजोगाई व केज विधानसभा मतदारसंघ स्वतंत्र स्वतंत्ररित्या होईल. वरील सात पैकी कोणता आरक्षित होणार? याचे उत्तर पुनर्रचना कार्यक्रमानंतरच मिळणार आहे.
No comments:
Post a Comment