परळी वैजनाथ(प्रतिनिधी) : दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल परळी वैजनाथ येथे दरवर्षीप्रमाणे कारगिल विजय दिवसानिमित्त वैयक्तिक गीत गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले .
या प्रसंगी प्रशालेतील इयत्ता चौथी ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला .
यानुषांगणे आज प्रार्थमिक गटासाठी सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली, या स्पर्धेत इयत्ता चौथीतील कु.आरोही पाटील व कु.अंश राज यांनी प्रथम क्रमांक तर कु.आदित्य गित्ते व कु. श्रीरंग देशपांडे यांनी द्वितीय तर कु.अवणी मुंडे हिने त्रितीय क्रमांक प्राप्त केला. इयत्ता पाचवी मधिल कु.अनुश्री पुप्पलवार व कु. अक्षता रंजन यांनी प्रथम क्रमांक तर कु.श्लोक नानवते व कु.यशश्री दौंड यांनी द्वितीय तर कु.श्रावणी कांदे व कु. वेद चाटे त्रितीय क्रमांक प्राप्त केला.
याप्रसंगी परीक्षक म्हणून बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक व वादक श्री.दिनेश कुमार काळे सर (संगीत विशारद)व प्रशालेचे संगीत शिक्षक श्री.गणेश कांबळे सर त्याचबरोबर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.श्रीकांत पाटील सर व कलाविभाग प्रमुख श्री.प्रसाद देशपांडे सर यांची उपस्थिती तर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विषेश सहकार्य लाभले
या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील उपजत गायन, वादन,नृत्य या कलागुणांना वाव मिळवा या उद्देशने वरील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.ऊषा किरण गित्ते तसेच प्रशालेचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक मा. श्री. किरण गित्ते साहेब (सचिव, नगरविकास सार्वजनिक बांधकाम उद्योग पर्यटन विभाग त्रिपुरा सरकार) त्याचबरोबर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.श्रीकांत पाटील यांनी केले.
No comments:
Post a Comment