Sunday, July 28, 2024

कै.राजाभाऊ दहिवाळ यांच्या गोडजेवणा निमित्त बालकिर्तनकार जनाई महाराज कोकाटे यांचे कीर्तन.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दीनदयाळ बँकेचे संचालक व भाजपाचे जेष्ठ नेते राजाभाऊ रामभाऊ दहिवाळ यांचे 17 जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या गोड जेवणाच्या  कार्यक्रमानिमित्त मंगळवार दि.30 जुलै रोजी माणिकनगर  येथे बालकिर्तनकार ह.भ.प.जनाई महाराज कोकाटे यांचे कीर्तन होणार आहे. 
सामाजिक व धार्मीक क्षेत्रात अग्रेसर असलेले व्यक्तीमत्व म्हणून सर्वपरिचित असलेले व्यक्तीमत्व, दीनदयाळ बँकेचे संचालक व भाजपाचे नेते राजाभाऊ दहिवाळ यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांचा गोडजेवणाचा कार्यक्रम मंगळवारी होणार असून यानिमित्त  माणिकनगर येथील राहते घर, डॉ.सेवेकर यांच्या दवाखान्याच्या पाठीमागे, परळी वै. येथे सकाळी 11 वाजता बालकीर्तनकार ह.भ.प.जनाई महाराज कोकाटे संगमकर यांचे कीर्तन होणार आहे.
या कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन माणिक रामभाऊ दहिवाळ, गजानन, विजयानंद, दयानंद राजाभाऊ दहिवाळ व समस्त राजाभाऊ दहिवाळ यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment